Rajyasabha Election | गुलाल आम्हीच उधळणार- उद्धव ठाकरे

मुंबई | राज्यसभेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यसभेची निवडणुकीचा गुलाल आम्हीच उधळणार, असा विजयाचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

राज्यसभेची निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. विकास निधी वाढवून मिळण्याच्या आश्वासनावर माकप आमदार विनोद निकोले यांनी महाविकास आघाडीला दिलं आहे. तर सपा आमदार रईस शेख यांनी आम्ही आमची मते धर्मनिरपेक्ष विचाराला दिली असल्याचं सांगितलं.

आज मतदानावेळी भाजपचे पोलिंग एजंट पराग अळवणी यांनी जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांची मतं बाद करण्याची मागणी केली आहे.

भाजपने आतापर्यंत तीन मतांवर आक्षेप घेतला आहे. भाजपने आक्षेप घेतलेल्या मतांमध्ये सुहास कांदे, जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांच्या नावाचा सामावेश आहे. तसेच काँग्रेसचे आमदार अमर राजुरकर यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतावर आक्षेप घेतला आहे.

दरम्यान, देशातील चार राज्यांतील 16 राज्यसभेच्या (Rajya Sabha) जागांसाठी मतदान होणार आहे. राजस्थान (Rajasthan), कर्नाटक (Karnataka), हरियाणा (Haryana) आणि महाराष्ट्रातील (Maharashtra) राज्यसभेच्या 16 जागांसाठी मतदान होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

अमृता फडणवीसांच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज; केली ‘ही’ नवी घोषणा 

“हवेत उडणाऱ्या भाजपच्या विमानाचं संध्याकाळी लँडिंग होईल” 

“आजपासून भाजपच्या अध:पतनाला सुरुवात झालीये” 

राज्यसभा निवडणुकीचं मतदान सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का! 

एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट; भाजपच्या गोटात खळबळ