मध्यावधी निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई | शिवसेनेच्या चिन्हाबद्दल चर्चा सुरू आहे. कायद्यानुसार धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला दिला आहे.

सगळे आमदार गेले, तरी पक्ष अस्तित्वात असतो. तुम्ही भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका. जे 15-16 आमदार माझ्याबरोबर राहिलेत त्यांचं जाहीर कौतुक करायचंय. अशी जिगरीची माणसं असतात, तिथे विजय होतोच. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

धनुष्य बाण हे निवडणूक चिन्ह शिवसेनेकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेना विधीमंडळ पक्ष हा वेगळा असतो आणि रस्त्यावर संघर्ष करणारा पक्ष वेगळा आहे. त्यामुळे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह कोणीही हिरावून घेऊ शकत नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

ज्यांनी टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात. मग तुमचं हे प्रेम खरं आहे की खोटं हे जनतेला कळू द्या. शिवरायाचा महाराष्ट्र आहे. डोळे नसलेल्या धृतराष्ट्राचं राज्य नाही, असंही ठाकरे यांनी शिंदे गटाला खडसावलं.

आमच्याबद्दल प्रेम दाखवणाऱ्यांची दोन वर्ष दातखीळ बसली होती का. आमच्यावर टीका झाली तेव्हा यांचं प्रेम का दिसलं नाही. आमच्यावर टीका होत असताना गप्प का होतात?, असा सवाल त्यांनी केला आहे.

मला या गोष्टीचा अभिमान आहे की सामान्य लोकांना शिवसेनेनं मोठं केलं. जे लोक मोठे झाले ते गेले. त्यांना जाऊ द्या, मात्र आजही अनेक लोक शिवसेनेसोबत आहेत, असंही ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘… त्यामुळे नांदा सौख्यभरे अशाच शुभेच्छा देतो’, छगन भुजबळांचा शिंदे सरकारला टोला 

शिंजो अबे यांच्यावर हल्ला करणारी ‘ती’ व्यक्ती ताब्यात, महत्त्वाची माहिती समोर

पेंग्विनची चेष्टा यात्रा म्हणत निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघात

काळजी घ्या! राज्यात मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

‘गाफिल राहू नका, नव्या चिन्हाचीही तयारी ठेवा’; उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना निर्देश