…..तर मला असलं हिंदुत्व नको- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई | आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकत्र आलो आणि हिंदुत्वात वचन पाळणं याला महत्व आहे. वचन जर मोडलं तर जात असेल तर असं हिंदुत्व मी स्वीकारायला तयार नाही, अस टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.

शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

मी आजही सांगतो, शिवसेना महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी लढण्याकरिता जन्माला आली. मराठी माणसासाठी जन्माला आली. त्यानंतर देशातील हिंदुवर गडांतर येतंय असं शिवसेनाप्रमुखांच्या लक्षात आलं तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचा अंगीकार केला, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेनाप्रमुखांचा शिवसैनिक मुख्यमंत्री पदावर बसवणार हे माझं वचन आहे आणि त्या दिशेने टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे, असं मी मानतो, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-“महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा एक नाटक होतं त्यांनी केलेली उपोषणं आणि सत्याग्रह देखील ढोंगीच”

-सावरकरांच्या विचारांशिवाय खरा हिंदुत्ववाद समजणार नाही- विक्रम गोखले

-“ठरल्याप्रमाणे सगळं झालं असतं तर आज मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो नसतो”

-एक प्रवास कधीच न विसरता येणारा; अमोल कोल्हे झाले भावूक

-“सरकारकडे अर्थ नसला तरी शब्दरत्न बक्कळ आहेत; मोदी सरकारचा अर्थसंकल्प पोकळ”