महाराष्ट्रातील पोलिसांसाठी मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

पुणे | महाराष्ट्र पोलिसांसाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पोलिसांसाठी नेमबाजी प्रशिक्षण केंद्र उभारणार असल्याची महत्वाची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे 13व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला.

नेमबाजी श्वासावर नियंत्रण ठेवणारा उत्तम योगाचा प्रकार आहे.पोलिसांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी शासन कटिबद्ध असून राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पोलिसांसाठी नेमबाजी प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा करून पोलिस विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

पोलीस आणि संरक्षण दलामुळे सर्वसामान्य लोक निश्चित असतात. अचुकता आणि शिस्त हे पोलीस दलाचं वैशिष्ट्य आहे. विजेत्यांचे अभिनंदन मात्र पुढच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने विजेतेपद मिळवावं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देशातील प्रत्येक पोलिसाचा नेम अचूक असणं गरजेचं आहे. पेलिसांच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असल्याचं ठाकरेंनी म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या- 

सर्व सामान्यांना न्याय देण्यासाठीच मी नवीन पक्षाची स्थापना करणार आहे- सदाभाऊ खोत

…अन् केंद्र सरकार सोन्याची अंडी देणारी कोंबडी विकायला निघालंय- प्रकाश आंबेडकर

मी माझं जीवन बाळासाहेबांना अर्पण केलं आहे, त्यांचे विचार माझ्या नसानसात आहेत- संजय राऊत

कसं का होईना झालो ना चार वेळा उपमुख्यमंत्री- अजित पवार

सीमाप्रश्न म्हणजे काही कौरव पांडवाचं युद्ध नाही- संजय राऊत