“उद्धव ठाकरे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करणार”

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुण्यात शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली. त्याच्यावरुन राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. काल पुणे महापालिकेमध्ये जात असताना हा सगळा प्रकार घडला.

शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पायऱ्यांवरून खाली पडले. त्यानंतर किरीट सोमय्या यांना जवळच्या संचेती रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

हल्ल्याविषयी बोलताना किरीट सोमय्या यांनी म्हटलं की, जे काल महापालिकेत माफीयासेनेनी गुंडगिरी केली होती. ते त्यांचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून केली होती.

तीन लोकांवर सुजित पाटकर, संजय राऊत आणि ऑर्डर देणाऱ्या उद्धव ठाकरेंवर हत्येचा गुन्हा दाखल करावा लागणार असल्याचंही यावेळी सोमय्यांनी म्हटलं.

कोव्हिड सेंटर प्रकरणाची चौकशी झाली तर उद्धव ठाकरेंना जाब विचारला जाईल आणि त्यांना याचं उत्तर देणं भारी पडणार आहे, असं म्हणत किरीट सोमय्यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

दरम्यान, रूग्णालयात दाखल केल्यानंतर किरीट सोमय्यांचा बीपी सातत्यानं वाढत होता. मात्र, आता बीपी कंट्रोलमध्ये आला असल्याची माहिती त्यांनी दिली.

भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुण्यात शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्कीमुळे चांगला राडा झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातही वातावरण चांगलंच तापल्यातं पहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  ठाकरे सरकारचं टेन्शन वाढलं! वाईन विक्रीच्या विरोधात अण्णा हजारे उपोषण करणार

 बापासाठी चिमुकली ढसाढसा रडली; पाहा डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ

 प्रसिद्ध मराठी अभिनेत्री किशोरी शहाणेंच्या गाडीचा भीषण अपघात, कार उद्ध्वस्त

 ना विराट ना माॅरिस, ‘हा’ ठरलाय IPL सामन्यातील सर्वात महागडा खेळाडू

“इस शॉट को क्या नाम दूं?”, राशिद खानने फिरवली बॅट अन्…; पाहा व्हिडीओ