मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सामनाचे श्र कार्यकारी संपादक संजय राऊतांना (Sanjay Raut) मुलाखत दिली. यात त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच गेल्या महिन्याभरात राज्यात झालेल्या राजकीय नाट्यावर उद्धव ठाकरेंनी भाष्य केलीये.
तुम्हीही गेले अनेक वर्ष शिवसेना अनुभवत आहात. आम्ही शिवसेना एक परिवार म्हणून बघत आलोय. बाळासाहेबांनी आम्हाला तेच शिकवलं की एकदा आपलं म्हटलं की ते आपलंच, एखाद्यावर विश्वास टाकला की आम्ही त्याच्यावर अंधविश्वास टाकतो. त्याला ताकद देण्यापासून पूर्ण जबाबदारी ही त्याच्यावरती टाकतो, असं कारण उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
देशभरात पर्यटन करण्याची गरज लागली नसती. हजारो कोटी रुपये खर्च केले केले असे मी ऐकलं. विमानांचा खर्च, हॉटेलचा खर्च, त्याच्यानंतर काही अतिरिक्त खर्च म्हणजे खोक्यातला खर्च, खोक्यात काय दडलंय? ते देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला माहित. पण हे फुकटात झालं असतं आणि सन्मानाने झालं असतं, असंही उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना सुनावलं आहे.
जे शिवसेनेसोबत ठरवलं होतं, अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पद तेच तर तुम्ही आता केलं, ते तेव्हाच केलं असतं तर निदान पाच वर्षात भाजपला एकदा तरी अडीच वर्षात मुख्यमंत्रीपद मिळालं असतं, असाही टोला त्यांनी लगावला आहे.
मी ज्यावेळी गुंगीत होतो, रुग्णालयात होतो त्यावेळी काही जणांनी बाहेर हालचाली सुरु केल्या होत्या, काही जणांनी माझी प्रकृती सुधारणार नाही यासाठी काही जणांना देव पाण्यात ठेवले होते. तेच लोकं पक्ष बुडवायला निघाले होते, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.
मी कुटुंबप्रमुख, पक्ष प्रमुख शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझी हालचाल होत नव्हती त्या काळामध्ये ह्यांच्या हालचाली जोरात होत्या. नाही म्हटलं तरी हे वेदनादायी सत्य आयुष्यभर राहणार आहे. की जेव्हा मी तुम्हाला जबाबदारी दिली होती पक्ष सांभाळण्याची, दोन नंबरचं पद दिलं होतं. पक्ष सांभाळायला म्हणून पूर्ण विश्वास दिला होता. तो विश्वासघात तुम्ही केला, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय.
महत्त्वाच्या बातम्या-
‘…त्याच आईला गिळायला निघालेली ही अवलाद’; उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंवर बरसले
“मी बरा होऊ नये म्हणून काहींनी देव पाण्यात बुडवले, तेच पक्ष बुडवायला निघालेत”
शिवसेनेला आणखी एक मोठा झटका, अर्जुन खोतकर शिंदे गटात सामील?
हल्लाबोल, आसूड, गोप्यस्फोट; संजय राऊतांनी शेअर केला उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा टीझर
‘अब राजा वही बनेगा जो हकदार होगा’, मनसे नेत्याच्या सूचक ट्विटने खळबळ