“आमिषाला बळी पडू नका”, माजी नगरसेवकांना पक्षप्रमुखांचा सल्ला

मुंबई | शिवसेनेत झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC Election 2022) निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन काल (दि. 12 ऑगस्ट) रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची एक बैठक घेतली.

पालिका निवडणूका जवळ येत असून प्रत्येकाने आपापल्या विभागात कामे करत राहा, तुम्ही माजी नगरसेवक असलात तरी कामे थांबवू नका, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना दिला.

तसेच कामांमध्ये अडथळे येत असल्यास आयुक्त (Commissioner) उपायुक्त (Deputy Commissioner) यांच्या भेटी घ्या. कामांचा पाठपुरावा करा आणि कामे तडीस न्या, असा आदेश देखील ठाकरेंनी दिला.

तसेच सध्याच्या राजकीय घडामोडी लक्षात घेऊन निवडणुकांच्या तोंडावर कोणाच्याही कोणत्याही आमिषाला किंवा प्रलोभनाला बळी पडू नका. हे देखील उद्धव ठाकरेंनी आवर्जून सांगितले.

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची शिवसेना भवनात बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेचे नेते अनिल देसाई, सुभाष देसाई, अनिल परब, रविंद्र वायकर आदी लोक उपस्थित होते.

यावेळी आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराची आणि कामाची रुपरेषा ठरविण्यात आली. नगरसेवकांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, जनतेची कामे करण्याची गरज आहे, असे ठाकरे यांनी सांगितले आहे.

शिवसेनेच्या एकूण 97 नगरसेवकांपैकी यावेळी बैठकीला 13 नगरसेवक गैरहजर होते. त्यांनी वैध कारणे सांगितल्याचे मावळत्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar)यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

“मला तर हे 2019 ला कळाले होते” – उद्धव ठाकरे

आमदार संजय शिरसाट परतीच्या वाटेवर? वाचा काय म्हणाले शिरसाट?

“बाबांनो हात जोडून सांगतो, मी पंतप्रधानपदाचा दावेदार नाही…”

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतही भूकंप?; ‘या’ दोन नेत्यांमुळे पवारांचं टेंशन वाढलं

गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना मोलाचा सल्ला, म्हणाले…