मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (शनिवारी) 7 मार्चला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तसेच ते अयोध्येत शरयुच्या आरतीमध्ये सहभागी होणार होते. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे ते शरयुची आरती टाळणार असल्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश सरकारने शरयुची आरती टाळण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांना केलं आहे.
कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. अनेकांना या व्हायरची लागण झाली असून अनेकांनी यामुळे आपला जीव गमावला आहे. या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सामूहिक आरती टाळण्याची शक्यता आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेत उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची माहिती दिली होती. उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा कसा असेल याबाबत त्यांच्यात चर्चा झाली.
दरम्यान, उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं आहे, अशी टीका विरोधकांनी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा महत्वाचा आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“अहो, काळजी नको हे सरकार आपसातील अंतर्विरोध अन् विसंवादातूनच पडेल”
-ठाकरे सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यकाळातील 20 महत्वपूर्ण निर्णय; वाचा यादी
-कोरेनाचे थैमान! भारतातील करोनाबाधितांची संख्या पोहचली 30 वर
-जनाची नाही किमान मनाची तरी…; मनसेची उद्धव ठाकरेंवर विखारी टीका
-“ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी सरकार सकारात्मक”