“उद्धव ठाकरेच 25 वर्षे मुख्यमंत्री राहतील”; सुप्रिया सुळेंना राऊतांचं प्रत्युत्तर

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात राज्यसभा उमेदवारीविषयी चर्चा रंगल्या आहेत. अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होऊ दे असं साकडं घातलं आहे.

मला मुख्यमंत्री कधी करायचं हे जनता ठरवेल, असंही वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं आहे. आता यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे सध्या मुख्यमंत्री असून हेच 25 वर्ष मुख्यमंत्री राहतील असं सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे, असं संदय राऊत यांनी म्हटलं.

महाराष्ट्राच्या राजकारणात लोक संभ्रम निर्माण करत असतात, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.

सध्या उद्धव ठाकरेंकडे आघाडीचं नेतृत्त्व आहे आणि यावर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सोनिया गांधी, राहुल गांधी हे सर्वजण आनंदी आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

  काॅंग्रेसमध्ये राज्यसभा उमेदवारीवरुन नाराजी, महासचिवांचा राजीनामा

  “राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात संजय राऊतांनी आग लावली” 

 “विभास साठेंचा ‘मनसुख हिरेण’ होऊ नये”; किरीट सोमय्या आक्रमक

  मुख्यमंत्र्यांवर टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरली, म्हणाले…

  आर्यन खान प्रकरणानंतर समीर वानखेडेंना मोठा धक्का, महाराष्ट्राबाहेर बदली