कोकणातून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेना दुभंगली. शिवसेनेतून एक एक करीत अनेक आमदार आणि खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाले. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला.

बंडाच्या याच पार्श्वभूमीवर आता कोकणातून देखील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धक्का मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते राजन साळवी हे शिंदे गटात सामील होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कोकणात सध्या तीन आमदार आहेत. यात वैभव नाईक (Vaibhav Naik), भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि राजन साळवी (Rajan Salavi) यांचा समावेश आहे. यांच्यापैकी राजन साळवी हे शिंदे यांच्या गटात जाण्यासाठी उत्सुक असल्याचे बोलले जात आहे.

गेले काही दिवस ते शिंदे गटाच्या आमदारांच्या संपर्कात असून ते विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना देखील भेटले आहेत.

त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोकेदुखीत आणखी वाढ झाली आहे. त्यांना आणखी एका पक्षांतराला सामोरे जावे लागणार आहे. कोकणात लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदार संघाचे साळवी हे आमदार आहेत.

आतापर्यंत साळवी शिवसेनेसोबत एकनिष्ठ होते. आता ते शिवसेनेला रामराम करणार आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी विरोध केला होता.

परंतु दुसरीकडे राजन साळवी यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिला होता. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत (Uday Samant) यांनी कोकण दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी देखील रिफायनरी प्रकल्पाला पाठिंबा दिला होता.

कोकणातील उदय सामंत आणि दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यानंतर आता राजन साळवी शिवसेनेच्या हातावर कोकणाचा नारळ ठेवणार आहेत, अशा स्वरुपाची माहिती समोर येत आहे.

आगामी काळात राजन साळवी आणि इतर दोन आमदार वैभव नाईक आणि भास्कर जाधव काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या – 

दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर सीबीआयची मोठी कारवाई

“शेतकरी विरुद्ध मोदी सरकार संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता”

बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेनंतर देशभरात संताप व्यक्त!

संजय राऊतांबाबत ईडीच्या तपासात महत्त्वाची माहिती उघड

“राष्ट्रवादीतील या पाच बड्या नेत्यांची चौकशी करायची आहे”