मुंबई | 10 दिवसांच्या सत्तानाट्यानंतर अखेर महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झालं. एकनाथ शिंदे यांनी काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या.
शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनात दाखल झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सत्तेत आल्यानंतर शिंदे सरकारने आरे कारशेडसंदर्भात मोठा निर्णय घेतला. कांजूरमार्गला नेलेलं कारशेड पुन्हा आरेमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शिंदे सरकारच्या या निर्णयावरून उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की कृपा करून माझा राग मुंबईवर काढू नका, अशी विनंती उद्धव ठाकरेंनी केली.
कांजूरमार्गचा जो प्रस्ताव आम्ही दिला त्यात कुठेही अहंकार नाही. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. मुंबईकरांच्या वतीने माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की आरेचा आग्रह रेटू नका, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तर आरे मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर देखील टीका केली.
महत्त्वाच्या बातम्या-
“बिचारे देवेंद्र फडणवीस…, केंद्राने त्यांचा शंकरराव चव्हाण केला”
पुढचे 5 दिवस महत्त्वाचे; ‘या’ भागांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी
सत्तेत येताच शिंदे-फडणवीसांचा ठाकरेंना धक्का; ‘या’ दोन निर्णयात बदल