मुंबई | मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीकेसीतील जाहीर सभेत विरोधी पक्ष असलेल्या भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरही टीकास्त्र सोडलं आहे.
मुन्नाभाई चित्रपटात कस त्याला गांधीजी दिसतात तस एकाला बाळासाहेब दिसतात, भगवी शाल घालुन फिरतो. म्हंटल अरे तो मुन्नाभाई तर लोकांच भल तरी करतो. त्यात शेवटी कळत की केमिकल लोचा झाला आहे, हे तसंच आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज यांना टोला लगावला आहे.
गेल्या 25 वर्षात आम्ही देखील सडलो. हिंदुत्वाचा बेसूर आणि भेसूर चेहरा आता आम्ही पाहत आहे. सामनात जे छापून येते ते जनतेच्या आणि हिंदुत्वाच्या हिताचे असते. भाजप जी भाषा वापरते तसं आम्ही बोलत नाही. खोटे बोलणे हे त्यांच्या हिंदुत्वात बसते आमच्या नाही. आत्ताची शिवसेना ही बाळासाहेबांची नाही म्हणता मग तुमचा पक्ष अटलजींची का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.
हनुमान चालिसा, भोंगे वाले ही यांची ए, बी, सी टीम आहे. आमचं हिंदुत्व खरे की खोटे हे ठरवणारे तुम्ही कोण? हिंदुत्व हे काय धोतर आहे का? कधी नेसलं कधी सोडलं? हिंदुत्व ही धरण्याची सोडण्याची गोष्ट आहे का?, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला प्रत्युत्तर दिलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
“मी काँग्रेसमध्ये उघड गेलो, तुमच्या सारखं पहाटे नाही गेलो”
“तिला वेळेवर आवर घालायला हवं, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”
शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या केतकीला राज ठाकरेंनी झापलं, म्हणाले…
“केतकीला चांगला चोप देणार, चार पाच छान चापट्या दिल्या ना…”
‘मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर…’; नवनीत राणांचं उद्धव ठाकरेंना नवं आव्हान