उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना मोठा झटका; नेतेपदावरून केली हकालपट्टी

मुंबई | सोशल मीडियावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नावाने एक पत्र व्हायरल होत आहे. या पत्रात एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्षनेते पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना झटका दिला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांना सेनेच्या नेते पदावरून हटवलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्याविरोधात खरंच मोठी कारवाई करण्यात आली की काय? याबाबतचा संभ्रम निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांना पक्षनेते पदावरुन खरंच काढलं का? याबाबत शिवसेना पक्षाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण पक्षाकडून खरंच ही कारवाई करण्यात आली असेल भविष्यात तर शिंदे गटाच्या अडचणी वाढू शकतात.

उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी असलेलं एक परिपत्रक जारी करत हा आदेश देण्यात आला आहे. पक्षाविरोधी कारवाई केल्याचं कारण देत त्यांना सेनेच्या नेते पदावरून हटवलं आहे. तसेच हा मुख्यमंत्री शिवसेनेचा नाही, असं त्यांनी म्हटलंय.

उद्धव साहेबांनी काहीही बोललं तरी आम्ही त्यांच्याविरोधात काहीही बोलणार नाही. ते आमचे नेते आहेत. त्यांनी बोलावलं तर आम्ही त्याच्याकडे जाऊन चर्चा करू

आता तुम्ही कितीही डाव खेळले तरी आम्ही मागे हटणार नाही. एकनाथ शिंदे आता विधीमंडळाचे नेते बनले आहेत. त्यामुळे त्यांचं छोटं पद गेलं तर त्यामध्ये कमीपणा काय?, असा सवाल केसरकर यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मी अजूनही बाळासाहेबांचा शिवसैनिक आणि शिवसेनेचा आमदार” 

शिंदे सरकारची 4 तारखेला बहुमत चाचणी, मुख्यमंत्री म्हणतात…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये, घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

नीरज चोप्राने रचला आणखी एक इतिहास, मोडला स्वत:चाच विक्रम

काय सांगता? कोरोना व्हायरसमागे एलियनचा हात?, किम जोंग उनच्या दाव्याने खळबळ