उद्धव ठाकरेंचा जलवा कायम! ‘या’ यादीत टाॅप 5 मध्ये मिळवलं स्थान

मुंबई | मागील काही दिवसांपासून शस्त्रक्रिया झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित नव्हते. त्यामुळे विरोधी पक्ष भाजपने चांगलाच कांगावा केला होता.

भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. अशातच आता उद्धव ठाकरे यांना सर्वोत्त्म मुख्यमंत्र्यांच्या यादीत स्थान मिळवलं आहे.

अनेक सार्वजनिक कार्यक्रमात हजर राहिले नसले तरी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या टॉप पाच मुख्यमंत्र्याच्या यादीत उद्धव ठाकरे यांनी स्थान मिळवले आहे.

इंडिया टुडे समुहातर्फे एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं. या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता कायम असल्याचं दिसून आलं आहे. इंडिया टुडेच्या यादीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चौथं स्थान पटकवण्यात यश आलं आहे.

या यादीत पहिल्या क्रमांकावर ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी स्थान मिळवलं आहे. पटनायक यांनी केलेली कामगिरी 71.1 टक्के नागरिकांना समाधानकारक वाटली आहे.

दुसऱ्या स्थानी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना स्थान देण्यात आलं आहे. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या नऊ मुख्यमंत्र्यांच्या यादीत भाजपचे केवळ एक मुख्यमंत्री असल्याचं देखील पहायला मिळालं आहे.

दरम्यान, काही एका सर्वोक्षणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुसरा क्रमांक पटकवला होता. कोरोना काळात चांगली कामगिरी केल्यानं त्यांना दुसरा क्रमांक देण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

नरेंद्र मोदींची मोठी घोषणा! इंडिया गेटवर उभारणार सुभाष बाबूंचा भव्य पुतळा

 शरद पवार म्हणतात, “भाजपवाले कधीपासून गांधीवादी झाले…”

 …तर संपत्तीवर मुलींचा पहिला अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

  Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर

  धक्कादायक! कोरोना लसीचे तब्बल ‘इतके’ डोस घेतल्यामुळे आजोबांवर FIR दाखल