मुंबईतील सभेपूर्वी उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय, आता लवकरच…

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बीकेसी मैदानात शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला संबोधित करणार आहेत. परिणामी राज्यात चर्चांणा उधाण आलं आहे.

भाजप, राणा दाम्पत्य, मनसे या सर्वांनी उद्धव ठाकरेंवर हिंदूविरोधी असल्याची टीका केली होती. त्या सर्वांना ठाकरे आपल्या खास शैलीत उत्तर देण्याची शक्यता आहे.

सभेनंतर उद्धव ठाकरे राज्याचा दौरा करणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. परिणामी मोठ्या कालावधीनंतर उद्धव ठाकरे दौऱ्यावर असणार आहेत.

बीकेसी मैदानात होणारी सभा ही ऐतिहासिक असणार असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या सभेवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरेंवर सातत्यानं भाजपकडून बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख करत टीका करण्यात येत आहे. त्यावर देखील ठाकरे उत्तर देण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांंमध्ये राणा दाम्पत्य, एमआयएम प्रकरण, राणे प्रकरण यावरून शिवसेना अधिक आक्रमक स्वरूपात पाहायला मिळाली होती.

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या सभेपुर्वीच नवनीत राणा आणि रवी राणांनी दिल्लीत जाऊन हनुमान चालीसा म्हणत वादाला नव्यानं सुरूवात केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 चिंतन शिबीर सुरू असतानाच काॅंग्रेसला जोर का झटका; ‘या’ मोठ्या नेत्यानं सोडला पक्ष

 “बुस्टर डोस माहिती नाही पण मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असेल”

 “ज्यांनी बोलायला पाहिजे ते तर मोदींचे दास झालेत”

 ‘महिला असलीस तरी छपरीच तू’; राष्ट्रवादीकडून केतकीवर जहरी टीका

“राष्ट्ररक्षणासाठी हिंसा करण्याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलाय”