मुंबई | राज्याच्या राजकारणात सध्या विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी राज्याच्या राजकारणात रंगत आणली आहे.
भोंगा, हनुमान चालीसा, ओबीसी आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यावरून वाद वाढत आहे. अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना गंभीर इशारा दिला आहे.
उद्धव ठाकरेंवर सातत्यानं विरोधक बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा आधार घेत टीका करत आहेत. परिणामी ठाकरेंनी आपण सर्वांना 14 मे रोजी उत्तर देणार असल्याचं म्हटलं आहे.
बऱ्याच दिवसांनी माईकसमोर मास्क काढून बोलत आहे. आता असाच अनेकांचा मास्क 14 तारखेला काढणार आहे, असा इशारा ठाकरेंनी विरोधकांना दिला आहे.
आताचा कार्यक्रम पालिकेचा आहे, पाण्याचा आहे. राजकारणावर बोलून पाणी गढूळ करणार नाही. प्रत्येकाला याचं भान असलं पाहीजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
हल्ली विचारांचं प्रदुषण होत आहे, कोणी काहीही बोलत आहेत, विकृत विचार मांडले जात आहेत. राजकारण जरूर करा पण त्यात एक दर्जा असला पाहीजे, असा सल्ला ठाकरेंनी विरोधकांना दिला आहे.
14 तारखेला माझी सभा आहे, माझ्या मनात जे आहे ते मी बोलणार आहे. माझ्या मनात काही तुंबलेलं नाही पण काही गोष्टी आहेत त्या बोलणार आहे, असंही ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान, गेल्या काही काळापासून उद्धव ठाकरेंवर वैयक्तिक टीका वाढली आहे. अशात आता 14 तारखेला ठाकरे आपल्या भाषणातून कोणावर प्रहार करणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“आघाडी सरकारचा बुरखा टराटरा फाडणार” चंद्रकांत पाटील भडकले
सत्ता जाताच मागं लागली साडेसाती! इमरान खान यांच्या अडचणीत वाढ
मोठी बातमी! किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप
धक्कादायक! KGF 2 फेम अभिनेत्याचं निधन; बंगळुरूमध्ये घेतला अखेरचा श्वास
सर्वसामान्यांना सर्वात मोठा झटका; गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागला