तेजस ठाकरेंनी सापाची नवी प्रजाती शोधली

मुंबई : महाराष्ट्राच्या पश्चिम सह्याद्री घाटातून ‘कॅट स्नेक’ सापाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. या सापाच्या नव्या प्रजातीचं नाव ‘बोईगा ठाकरे’ असं ठेवण्यात आलं आहे. युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी (26 सप्टेंबर) एक ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. या ट्वीटमध्ये एका सापाचा फोटो आहे. ही सापाची नवी प्रजाती असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

सापाच्या या प्रजातीचं नाव आदित्य ठाकरे यांचा लहान भाऊ तेजस ठाकरे यांच्या नावावरुन देण्यात आलं आहे. या सापाच्या प्रजातीचा शोध घेण्यात तेजस ठाकरे यांनी लावला आहे. त्यामुळे या सापाच्या प्रजातीला त्यांचं नाव देण्यात आलं आहे.

ही नवी प्रजाती कॅट स्नेकच्या नावाने ओळखली जाते. या प्रजातीचा जीन बोईगापासून आला आहे. हा जीन संपूर्ण भारतात आढळतो, मात्र याच्या काही प्रजाती पश्चिम घाटात आढळतात, अशी माहिती फाउंडेशन फॉर बायोडायव्हर्सिटीचे डायरेक्टर डॉक्टर वरद गिरी यांनी दिली आहे.

तेजस ठाकरे यांच्या नेतृत्वात त्यांच्या टीमने या प्रजातीचा शोध लावला आहे, म्हणून या प्रजातीला ठाकरे नाव देण्यात आलं आहे.

दरम्यान, या जीनचा शेवटचा साप हा 1894 मध्ये आढळला होता. हा लांबीला 3 फूट असतो आणि हे साप बिनविषारी असतात, अशी माहिती वरद गिरी यांनी दिली.

 

महत्वाच्या बातम्या-