माझ्या महाराष्ट्रात ‘गोमाता’ आणि बाहेर जाऊन ‘खाता’; मुख्यमंत्र्यांचा भाजपवर हल्लाबोल

नागपूर | नागपूरमध्ये विधानसभेचं हिवाळी अधिवेशव सुरु आहे. सभागृहात भाषण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकर आणि गोवंश हत्याबंदीवरुन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्याला सावरकरांचं सर्व हिंदूत्व मान्य आहे का?, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी भाजपला केला आहे.

सावरकरांवरुन तुम्ही शिवसेनेवर टीका करत आहात. मात्र, तुम्हाला सावरकरांचं सर्व हिंदूत्व मान्य आहे काय?  गोवंश हत्याबंदीचा कायदा सर्व देशात का लागू झाला नाही? माझ्या महाराष्ट्रात माता आणि बाजूला जाऊन खाता?, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला आहे.

गोवंश हत्याबंदीवरुन भाजपची नेमकी भूमिका काय आहे. गोवंश हत्याबंदी संपूर्ण देशात का लागू नाही. रीजिजू आणि पर्रिकर म्हणाले होते की, आमच्या येथे मोठ्या प्रमाणात गोमास खाल्ले जाते. यावर भाजपची भूमिका वेगवेगळी आहे का?, असा सवाल त्यांनी केला आहे.

दरम्यान, इतर देशातील हिंदू घ्या, पण त्यांना ठेवणार कुठे, निर्वासितांची काळजी वाहणार कोण?, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुनही भाष्य केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-