मुंबई | विमा कंपन्यांच्या भूमिकेमुळे पात्र शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ मिळत नसल्याचा आरोप शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला आहे. राज्यात तब्बल 90 लाख शेतकरी योजनेस अपात्र ठरले आहेत. त्यामुळे सरसकट सर्व शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
पीक विमा योजनेची अंमलबजावणी आणि विमा कंपन्यांच्या कारभारावर उद्धव ठाकरेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ही योजना कंपन्यांच्या फायद्यासाठी नव्हे तर शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असल्याचं सांगत सरसकट सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजनेंतर्गत भरपाई देण्याची मागणी केली.
कंपन्यांचा नफा वगळून इतर सर्व पैसे शेतकऱ्यांना मिळायला हवेत. कंपन्या देत नसतील तर सरकारने तो पैसा परत घेऊन अन्य यंत्रणेमार्फत तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला हवा, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
शिवसेनेने आवाज उठवल्यानंतर दहा लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत 960 कोटी रुपयांची भरपाई मिळाली. यापुढेही शिवसेना या विषयाचा पाठपुरावा करेल, असं ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
लेकीला दोन वेळा आशीर्वाद दिला, यंदा लेकाला आशीर्वाद द्या; धनंजय मुंडेंची परळीकरांना भावनिक साद – https://t.co/2yuhJCTEEM @dhananjay_munde
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 24, 2019
नरेंद्र मोदींनी केलेल्या चांगल्या कामाचं कौतुक झालं पाहिजे- शशी थरूर
– https://t.co/hg8N2O4SxI @ShashiTharoor @narendramodi— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 23, 2019
काँग्रेसमुळे कोल्हापूरमध्ये महापूर- चंद्रकांत पाटीलhttps://t.co/QJmeMWVZ99 @ChDadaPatil @INCMaharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 23, 2019