“सातारकरांनी पाच वर्षापूर्वीच घाण फेकून दिली”

सातारा | सातारा शहरासाठी ग्रेड सेपरेटर, कास धरणाची उंची, तसेच बामनोली पर्यटनाबाबत वॉटर स्पोर्ट प्रकल्पाबाबत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे आभार मानले आहेत. याचा समाचार घेत खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धी पत्रक काढून शिवेंद्रराजे घेत असलेल्या श्रेयाबाबत टीका केलीये.

सातारकरांनी पाच वर्षापूर्वीच घाण फेकून दिली. नाकर्त्यांचा दुतोंडीपणा उघड. प्रशासकीय इमारतीचे भुमीपूजन कसं केलं, वर्क ऑर्डर आहे का, असले नकारात्मक प्रश्न ज्यांनी उभे केले, तेच आज प्रशासकीय इमारतीसाठी रुपये 10 कोटी मिळाल्याबद्दल अभिनंदन करीत आहेत. ते दुतोंडी असल्यानेच त्यांची द्विधा मनस्थिती झाली आहे, असं सांगत उदयनराजेंनी शिवेंद्रराजेेंना सुनावलं आहे.

गेल्या 5 वर्षात एक तरी मोठं काम दाखवा असे काल पर्यंत केकाटणारे, आज ग्रेड सेपरेटर आम्ही केला, प्रशासकीय इमारत चांगली होईल असे भाष्य करीत आहेत. गेल्या 5 वर्षात माविआने लोकहिताची कामे सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठेवून कामे केली आहेत. प्रत्येक ठिकाणी व स्तरावर विविध विकासकामे मार्गी लागली आहे, असं त्यांनी सांगितलं.

त्यांच्याकडे 40 वर्षे सत्ता असताना जे काही व्हायला पाहीजे होते ते कधीच झाले नाही. त्यामुळे माविआने केलेल्या कामांचा धसका घेवून, दुतोंडी भुमिका यांना घ्यावी लागत आहे दुतोंडी आणि स्वार्थी असणाऱ्या बाजारबुणग्यांची कुजकट दुर्घंधी युक्त घाण यापूर्वीच सातारकरांनी पालिकेतुन बाहेर काढून दूर फेकून दिली आहे, अशी टीका उदयनराजेंनी केली आहे.

नाक देखील कापलं गेलं तरी सुद्धा भोके आहेत असं म्हणत वर तोंड करुन ते फिरत आहेत. हे दुटप्पी राजकारणी माविआच्या कामाचं अभिनंदन करुन, आपणच निधी आणला अश्या दुटप्पी अविर्भावात आहेत, असंही उदयनराजे म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या- 

“राज्यपाल सावित्रीबाईंची थट्टा करत असतील तर आमचं रक्त थंड झालंय का?” 

राज ठाकरेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ, म्हणाले “संजय राऊतांनी….” 

“परमेश्वराने मला दूरदृष्टी दिली आणि मी भाजपमध्ये आलो”

पोस्टाची भन्नाट योजना! फक्त 95 रूपये गुंतवून मिळवा तब्बल 14 लाख

मार्केटमध्ये बंपर सेल सुरु, ‘या’ गाड्यांच्या किंमती झाल्या फारच कमी