उदयनराजेंना ठेंगा… भाजपात प्रवेश करतावेळेची प्रमुख अट मान्यच झाली नाही???

नवी दिल्ली | उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. निर्णय घेतावेळी त्यांनी काही महत्वाच्या अटी भाजपसमोर ठेवल्या होत्या. त्यातली प्रमुख अट काही मान्य झालेली दिसत नाहीये.

सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबत व्हावी अशी प्रमुख अट उदयनराजेंनी घातली होती. मात्र ती अट आता पु्र्ण होणार नाही.

आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकाच्या तारखांची घोषणा केली. मात्र सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही.

विधानसभा निवडणूक संपल्यानंतर आणि निकाल लागल्यानंतरच आता सातारा लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जातीये.

दरम्यान, विधानसभेबरोबर सातारा लोकसभेची निवडणूक जाहीर न होणं उदयनराजे भोसलेंना हा मोठा धक्का मानण्यात येतोय. 

महत्वाच्या बातम्या-