सातारा | शिवजयंतीनिमित्त छत्रपती उदयनराजे भोसले यांनी छत्रपतींचा इतिहासच्या आठवणींनी उजाळा दिला. यावेळी ते भावूक झाले होते. यानंतर प्रतिक्रिया देताना उदयनराजे गहिवरले होते.
300 वर्षांनंतरही छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा जल्लोष पाहून ते किती महान नेते होते, याची निव्वळ कल्पना आपण करु शकतो, अशा शब्दांत उदयनराजेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
एखाद्या व्यक्तीचा मृत्यूनंतर तिसरं झालं, की लोकं विसरतात. दहावं तेरावं तर लांबच राहिलं. शिवरायांची कधीच भेदभाव केला नाही. लोकशाहीचा पाया छत्रपती शिवरायांनी तयार केला. लोकांचा सहभाग असल्याशिवाय ते शक्य नाही, असंही उदयनराजे यांनी म्हटलंय. शिवाजी महाराज लोकांसाठी लढत होते, असंही ते म्हणालेत.
गाड्या असताना आज लोकं म्हणतात की मला कंटाळा आला. पण त्या काळी शिवाजी महाराजांनी घोड्यावरुन प्रवास करत अख्खं साम्राज्य उभारलं. छत्रपती शिवराय खरंच एक युगपुरुषच होते, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.
मी त्या काळात जन्मला आलो असतो, तर मी मावळा म्हणून धन्य झालो असतो, असंही त्यांनी म्हटलं. यानंतर उदयनराजेंच्या डोळे पाणवले होते. आपल्या भावनांना वाट मोकळी करुन देताना उदयनराजेंच्या गहिवरुन आलं होतं.
छत्रपती शिवरायांची प्रतिमा देव्हाऱ्यात ठेवली जाते. छत्रपती सर्व सामान्य जनसाठी लढले. मी त्यांच्या कुटुंबात जन्मलो, हे मी माझं स्वतःचं भाग्य समजतो, असही उदयनराजेंनी यावेळी म्हटलंय.
त्यांचे आदर्श टोळ्यांसमोर ठेवून मी माझं काम करत आलो. शिवाजी महाराज म्हणजे युगपुरुष होते. एका आयुष्यात एवढे किल्ले बांधणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. हॅट्स ऑफ टू यू, असं म्हणत उदयनराजेंनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केलंय.
महत्त्वाच्या बातम्या –
“मुख्यमंत्रिपदापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर माझ्या डोक्यावर देवेंद्र फडणवीस आणून ठेवला”
“आम्ही मराठ्यांच्या पोटचे नाही का?, आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का?”
ठरलं तर! भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी ‘या’ दिग्गज खेळाडूची वर्णी
‘कुणाची सुपारी घेऊन आलाय का?’; भर कार्यक्रमात प्रश्न विचारणाऱ्या तरूणावर अजित पवार भडकले
काय सांगता! दारू आणि तंबाखू सेवनात महिला अव्वल, धक्कादायक आकडेवारी समोर