राष्ट्रवादीला मोठा धक्का; खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर???

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षावर जाऊन भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. उदयनराजे भोसले देखील राष्ट्रवादीला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय.पूरस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं उद्यनराजेंनी सांगितलं असलं तरी ते भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातील काही नेत्यांसोबत पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजे भोसले हजर नव्हते. मात्र शरद पवार यांच्या बैठकीनंतर उदयनराजेंनी  देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. 

उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. उदयनराजेंचा भाजपप्रवेशाचा निर्णय राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असणार आहे. त्याचा संपूर्ण परिणाम राज्याच्या राजकारणावर  होऊ शकतो, असं बोललं जात आहे. 

उदयनराजे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये भाजपमध्ये प्रवेश कसा करता येईल. यावर चर्चा झाल्याचं समजतंय. यावेळी सुनील काटकर, दत्ता बनकर, संग्राम बर्गे हे कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकसभेचा राजीनामा देऊन त्यानंतर पोटनिवडणूकक विधानसभेसोबत एकत्रित घेण्याची उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्याचं कळतंय. 

सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादीला लोकसभा निवडणूकापासून धक्क्यावर धक्के बसू लागले आहेत. यआधीही शिवेंद्रराजेंनी अंतर्गत कलहामुऴे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपत प्रवेश केला आहे. काही दिवसांपासून रामराजे देखील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

-भारतीय संघात नाही पण ‘हा’ खेळाडू ‘या’ कारणामुळे असणार संघासोबत!

-ICC कसोटी क्रमवारी जाहीर; स्मिथचा कोहलीला दे धक्का??

-मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देणाऱ्या ‘त्या’ पोस्टरवरुन भाजपविरोधात संताप

-शोएब अख्तरचे स्मिथबाबत ट्वीट; त्यावर युवराज म्हणतो…

-‘चांद्रयान-2’चा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश