सातारा | शिवसेना नेते संजय राऊत यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्यावर टीका केली होती. यावर भाष्य करत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला आहे. ते साताऱ्यात माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत कोण मला माहित नाही. आम्ही कुणाबद्दल वाईट बोलत नाही. पण आमच्याबद्दल जर कोणी वाईट बोलल तर आम्ही बांगड्या घातल्या नाहीत, असा इशारा उदयनराजेंनी दिलाय.
प्रत्येकाला आपल्या घराण्याचा स्वाभिमान आहे. त्यामुळे कोणी शांत बसणार नाही. बाकी काही पेटलं तरी चालेल बघतोच, असं उदयनराजे म्हणालेत.
साताऱ्यात एका कार्यक्रमाला उदयनराजेंनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधल विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच राऊतांचा जोरदार समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीचा विषय हा छत्रपती संभाजीराजे आणि शिवसेनेतला आहे. इतरांनी त्यामध्ये चोमडेपणा करू नये. भाजपला इतकेच वाटत होते तर त्यांनी संभाजीराजे यांना 42 मतं द्यायला पाहिजे होती, असं संजय राऊत म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
देशभरात खळबळ उडवून दिलेल्या शीना बोरा हत्येप्रकरणात परमबीर सिंह कनेक्शन समोर!
‘या’ आमदाराने शिवसेनेचं टेंशन वाढवलं; पक्षाच्या बैठकीला दांडी, सभेलाही गैरहजर
“देश नही झुकने दुंगा विसरलात का?, भाजपच्या मोठाभाईला माफी मांगायला सांगा”
खळबळजनक! न्यूड व्हिडीओ व्हायरल झालेल्या खासदाराचा घरी सापडला मृतदेह
“आता माझा नंबर असेल, कारण जो कोणी तुमच्या विरोधात बोलणार त्याला…”