सातारा | मी भाजपमध्ये गेल्यानंतर कोणी माझा बँड वाजवायचा ठरवत असेल, पण माझा बँड फक्त मीच वाजवतो हे लक्षात असू द्या.. मीही बँड मास्तर आहे, अशा इशारा नुकतेच भाजपवासी झालेल्या उदयनराजे भोसलेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे.
उदयनराजेंनी नुकताच भाजपत प्रवेश केला आहे. आज साताऱ्यात महाजनादेश यात्रेत ते सहभागी झाले होते. यावेळी झालेल्या सभेत त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार तोफ डागली.
लोकं कामाकडे बघून मतदान करतात. ही कामं पूर्ण करणारी लोक आहेत. त्यामुळे मला आता माझं ईव्हीएमवरच उत्तर मिळालं, असं ते म्हणाले.
भाजप सरकारने पैसे दिल्याने सातारा शहरातील पुढील 50 वर्षांसाठी पाण्याच प्रश्न मिटला. तसेच पर्यटनचाही विकास झाल्याने पर्यटकही साताऱ्याकडे वळू लागले, असंही उदयनराजे म्हणाले.
दरम्यान, सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं.
महत्वाच्या बातम्या-
महाराजांनी फक्त आदेश द्यावेत… हा मावळा सगळ्या मागण्या पूर्ण करेल- देवेंद्र फडणवीस https://t.co/SMlbzQqNPa @Chh_Udayanraje @Dev_Fadnavis #महाजनादेशयात्रा
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 15, 2019
ते छत्रपती आहेत मी मावळा आहे… असं म्हणणारे अमोल कोल्हे आज म्हणतात ‘देशात राजे कोणीच नाही!’ https://t.co/Rj7pOmExRZ @kolhe_amol @Chh_Udayanraje @BJP4Maharashtra @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 15, 2019
शिकार करून जगणारी अवलाद आहे… तुकड्यावर जगणारी नाही; शिवेंद्रराजेंचा राष्ट्रवादीवर घणाघात https://t.co/JHkvIhbH0x @BJP4Maharashtra @NCPspeaks @kolhe_amol
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 15, 2019