महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांवर उज्वल निकम यांचे भाष्य; न्यायालयाकडे प्रामुख्याने तीन प्रश्न आहेत ते म्हणजे…

मुंबई | शिवसेना (Shivsena) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गट यांच्यातील कायदेशीर पेचावर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी सुनावणी पुढे ठकलली होती. त्यामुळे आज पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष न्यायालयाच्या निकालाकडे लागले आहे. यावर आता ज्येष्ठ वकील उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी भाष्य केले आहे.

सत्ता कोणाची आणि राजकीय पक्ष कोणाचा, याबाबत सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल का, याबाबत मला शंका आहे, असे निकम म्हणाले. पण न्यायालयाकडे प्रामुख्याने तीन प्रश्न असणार आहेत, असे निकम म्हणाले.

16 आमदारांच्या अपात्रतेची याचिका प्रलंबित असताना, राज्यात जे काही घडले ते घटनेला धरुन होते का? राज्यपालांना घटनेने विशेषाधिकार दिले आहेत, त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीनुसार बोलावलेले विशेष अधिवेशन घटनेला धरुन होते का? आणि निवडणूक आयोगापुढे जी कारवाई प्रलंबित आहे, त्यात सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करणार का? हे तीन मुख्य प्रश्न आहेत, असे निकम म्हणाले.

त्यामुळे आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय कोणत्या मुद्यांना हात घालणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भवितव्य देखील आज पणाला लागले आहे.

महत्वाच्या बातम्या –

“आज मुख्यमंत्री अपात्र ठरल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता”; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वर्तविली शक्यता

“शाळांमध्ये सरस्वती आणि देवींच्या फोटोएवजी महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत” – छगन भुजबळांच्या वक्तव्याने भाजप आक्रमक

“2014 ला मला उपमुख्यमंत्री होण्याची संधी होती, पण…”; एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

नाना पटोले तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर संतापले; म्हणाले, “सावंतांची तत्काळ…”

“…तेव्हा मला मिळणारा पाठिंबा तुम्हाला कळेल”; शशी थरुर यांची स्पष्टोक्ती