देश

हाफिज सईदच्या अटकेवर उज्ज्वल निकम म्हणतात…

मुंबई : “26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी हाफिज सईदला अटक करुन पाकिस्तान जगाला वेड बनवत आहे, अशी रोखठोक प्रतक्रिया विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली आहे. 

पाकिस्तानने हाफिजला अटक केली असली तरीही न्यायालयात काय पुरावे सादर करतात आणि त्याला दोषी सिद्ध करण्यासाठी किती प्रयत्न करतात याकडे बारकाईनं लक्ष ठेवणं महत्वाचं आहे. नाहीतर हे सर्व नाटक असल्याचं सिद्ध होईल, अशी शंका निकम यांनी व्यक्त केली आहे. 

हाफिज सईदला लाहोरहून गुजरांवाला जाताना येथे जात असताना बुधवारी अटक करण्यात आली. अटकेनंतर हाफिजला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. 

अटकेविरोधात हाफिज न्यायालयात दाद मागणार असल्याचं सईदने म्हटलं आहे. 

दरम्यान, मुंबईवर 26/11 ला हल्ला झाला होता त्यात हाफिज सईदची महत्वाची भूमिका होती. त्याचे पुरावे देखील भारताने पाकिस्तानला दिले होते.

IMPIMP