Ukraine crisis: “तुमच्यावर 9/11 हल्ला झाला तसाच…”; अमेरिकन संसदेला संबोधित करताना झेलेंस्की भावूक

नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्धामुळे (Ukraine crisis) जगाला विविध समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. रशियानं युक्रेनवर हल्ला करून आता 21 दिवसांहून अधिक काळ झाला आहे.

21 दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धात आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी कसल्याही परिस्थितीत रशियन सैन्याला युक्रेनवर ताबा मिळवण्याचे आदेश दिले आहेत.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेंस्की सातत्यानं जगासमोर युक्रेनची बाजू मांडत आहेत. अशातच त्यांनी अमेरिकन संसदेला संबोधित करताना भावनिक भाषण केलं आहे.

रशियानं फक्त आमच्या शहरांवर हल्ला केला नाही तर आमच्या स्वातंत्र्यावर हल्ला केला आहे. आम्हाला माहिती नाही युक्रेनचे नागरिक या युद्धातून कधी बाहेर पडतील, असं झेलेंस्की म्हणाले आहेत.

झेलेंस्की यांनी अमेरिकेच्या सार्वभौमत्वावर झालेल्या दोन हल्ल्यांची आठवण आपल्या भाषणादरम्यान काढली आहे. परिणामी अमेरिकन खासदार भावनिक झालेले पहायला मिळालं आहे.

1941 मध्ये पर्ल हार्बरवर जपानकडून बाॅम्ब हल्ला करण्यात आला होता. अगदी तसाच हल्ला सध्या रशिया युक्रेनवर करत आहे, असं झेलेंस्की म्हणाले आहेत.

कुख्यात दहशतवादी लादेननं अमेरिकेच्या सर्वात उंच इमारतीवर 9 सप्टेंबर रोजी विमानानं हल्ला केला होता. या हल्ल्याची देखील आठवण झेलेंस्की यांनी अमेरिकेने खासदारांना करून दिली आहे.

रशिया सध्या युक्रेनवर पर्ल हार्बर आणि 9/11 सारखे हल्ले करत आहे. परिणामी सर्वांनी आम्हाला मदत करण्याची गरज असल्याचं मत झेलेंस्की यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, झेलेंस्की यांनी आपण रशियाविरोधात ठामपणे लढत राहाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. परिणामी रशिया-युक्रेन युद्ध सध्यातरी थांबण्याची चिन्ह नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “CD होती पण वेळ नव्हती, आता CD बाहेर काढणार”; एकनाथ खडसेंचा पुनरूच्चार

 Holi: होळीत केसांची घ्या खास काळजी; ‘या’ पाच ट्रिक नक्की वापरुन पाहा

Russia Ukraine War: “जेव्हा इतिहास लिहिला जाईल…”, रशियाने भारताला दिलेल्या ऑफरमुळे अमेरिका नाराज

फडणवीसांच्या टीकेला विधानसभेत अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

होळी-धुळवडसाठी सरकारची नवी नियमावली जारी; वाचा काय आहेत निर्बंध