मुंबई | सध्या महाराष्ट्राचं सरकार काेसळेल अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान या सर्व गाेष्टींबाबत घटनाकार उल्हास बापट यांनी माध्यमांशी बोलताना महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेचे 55 आमदार आहेत. त्यापैकी एकनाथ शिंदे यांना 37 अथवा त्यापेक्षा जादा आमदारांचा पाठिंबा असेल तर त्यांच्याकडे बहुमताचा आकडा असल्याचं स्पष्ट हाेईल. त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायदा प्रमाणे अपात्र ठरणार नाहीत, असं बापट म्हणालेत.
दरम्यान मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला आणि सरकार पडले तर राज्यपाल विराेधकांना सत्ता स्थापनेची संधी देतील, असं उल्हास बापट यांनी सांगितलं आहे.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाही म्हटल्यास तर काेणीच मुख्यमंत्री हाेऊ शकणार नाही. राज्यपाल राष्ट्रपती यांच्याकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस करतील. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू हाेऊ शकेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी गटनेता बदलला आहे ते कायदेशीर आहे. मात्र जर शिंदेंकडे 37 सदस्य असतील तर गटनेता कोण आहे याला फार महत्व उरत नाही. कारण ते अपात्र ठरणार नाही. प्रत्येकाचं पत्र वेगवेगळं सह्यांसकट राज्यपालांना द्यावं लागेल. हे पत्र त्यांनीच लिहिलं आहे का याची शहानिशा होते. किंवा राज्यपालांसमोर सर्व 37 लोकांना उभं केलं तरी प्रश्न सुटू शकतो, असंही उल्हास बापट यांनी सांगितलं.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता राज्यात सत्तापालट होणार का? याची चर्चा सुरु आहे. शिंदे यांच्या गटाकडून भाजपसोबत सत्ता स्थापन करावी असा आग्रह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे धरला असल्याची माहिती आहे. सूरत आणि गुवाहाटीमध्ये या गटासोबत काही भाजप नेते दिसून देखील आले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘संध्याकाळी 5 पर्यंत मुंबईत या, अन्यथा…’; बंडखोर आमदारांना शिवसेनेचा इशारा
“शिवसैनिकांनो काळजी करू नका, हा बाळासाहेबांचा जिगरी दोस्त अजून म्हातारा झाला नाही”
‘त्या’ दिवशी नेमकं असं काय झालं की शिंदेंनी डायरेक्ट सूरत गाठलं?, खरं कारण आलं समोर
‘या’ आमदारानं उद्धव ठाकरेंना आधीच अलर्ट दिला होता!, आता तोही आमदार या फोटोत
सर्वात मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण