पुणे | शिंदे गटातील आमदार अपात्र ठरल्यास राज्यात काय परिस्थिती निर्माण होईल, असा प्रश्न सर्वांना पडलाय. यावर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी भाष्य केलं. बापट यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.
एक तर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा देवेंद्र फडणवीसांच्या मागे जर काही कारणाने काही आमदार जाऊन बहुमत निर्माण झालं तर त्यातून नवीन सरकार स्थापन होऊ शकतं. पण तो सगळा राजकीय तर्क-वितर्कांचा भाग आहे, असं उल्हास बापट यांनी सांगितलं आहे.
इतर प्रकरणांत अपात्र ठरल्यानंतर देखील मंत्री राहता येतं. 6 महिन्यांच्या आत निवडून येता येतं. पण पक्षांतरबंदी कायद्यानुसार जर अपात्र ठरले, तर त्यांना मंत्री राहता येत नाही, असं उल्हास बापट यांनी सांगितलं आहे.
पुन्हा निवडून आल्यानंतरच मंत्री होता येतं. त्यामुळे खूपच कठीण परिस्थिती निर्माण होईल. कारण मुख्यमंत्रीच गेले, तर सरकारच बरखास्त होऊ शकतं, अशी माहिती बापट यांनी दिली आहे.
दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्ष अद्याप पूर्णपणे संपुष्टात आलेला नाही. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाखल याचिकांवर आज सुनावणी झाली.
दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टानं सर्व पक्षकारांकडून प्रतिज्ञापत्र मागितले आहेत. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी होणार आहे. तोपर्यंत राज्यातील परिस्थिती जैसे थे राहणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
खासदार नवनीत राणा यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!
सर्वात मोठी बातमी! ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय
करिना कपूर खान तिसऱ्यांदा आई होणार?, स्वत:च केला खुलासा
‘घोटाळे तुम्ही करायचे, लफडी तुम्ही करायची पण जेव्हा…’, खासदारांच्या बंडानंतर आदित्य ठाकरे संतापले
सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी 1 ऑगस्टला, राजकीय पेच कायम