कोरोना झालाय सर्दी-खोकला?, आता घरच्या घरी चेक करा

नवी दिल्ली | कोरोना काळात कोरोनाच्या विविध व्हेरियंटच्या माध्यमातून कोरोनानं सर्वत्र धुमाकुळ घातलेला पहायला मिळतोय. जगभरात कोरोना रूग्णांमध्ये अद्यापही घट झालेली नाही. कोरोनाची लक्षणं समजणं आणि त्वरित उपाय करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे.

कोरोना हा ताप आणि सर्दी असल्यावर होतो असा समज निर्माण झाल्यानं मोठी भीती निर्माण झाली होती. पण ताप आणि सर्दी असणाऱ्या रूग्णांमध्ये कोरोनाची कसलीही लक्षणं आढळली नसल्याची प्रकरणंही समोर आली आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असताना जानेवारीच्या सुरूवातीला ओमिक्राॅन व्हेरियंटनं सर्वांना चिंतेत टाकलं होतं. जगभरात ओमिक्राॅनच्या रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ झाली होती. पण सध्या ओमिक्राॅनची रूग्णसंख्या कमी होताना दिसत आहे.

ओमिक्राॅनची रूग्णसंख्या झपाट्यानं वाढलेली असली तरी ओमिक्राॅनच्या कारणानं मृत्यू होण्याचं प्रमाण कमी आहे. पण ओमिक्राॅन असेल वा कोरोना असेल भितीनं तब्येत खराब होण्याच प्रमाण वाढलं आहे.

सध्या थकवा येणं, सातत्यानं सर्दी असणं, सुगंध न येणं, चव न लागणं, अशी लक्षणं दिसत असतील तर आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. ही लक्षणं प्रामुख्यानं कोरोना रूग्णांमध्ये आढळतात.

अनेकदा साध्या आजारातील आणि कोरोनातील फरक समजायला वेळ लागतो. परिणामी चिंता व्यक्त करण्यानं आणि भितीनं आजार वाढायला लागतो. कोरोनाची लक्षणं आणि साधी ताप-सर्दी यातील अंतर समजून घेणं गरजेच आहे.

घरातील एका व्यक्तीला सर्दी ताप असेल आणि त्याच्या सहवासात आल्यानं इतरांना तसंच जाणवलं तर समजायचं की त्या व्यक्तीला ओमिक्राॅन विषाणूनी घेरलं होतं. पोटाच्या समस्या जाणवत असतील तरीही काळजी घेणं गरजेचं आहे.

आजारपणानंतर केस गळतीची समस्या सुरू असेल तर ओमिक्राॅनची लक्षणं असण्याची शक्यता आहे. संशोधकांच्या संशोधनानंतर अशा प्रकारची लक्षणं असलेली रूग्णंसंख्या वाढली आहे.

आजारपणामध्ये डोळ्यांची समस्या जाणवायला लागली असेल तर हे ओमिक्राॅन आजाराचं लक्षण आहे.  डोळ्याला काही संक्रमणाचा फटका बसला असेल तर हे देखील आरोग्यासाठी घातक आहे.

स्किन इन्फेक्शन झाल्यावर देखील ओमिक्राॅनचा धोका संभवतो. तज्ज्ञांच्या आणि संशोधकांच्या अभ्यासानंतर ओमिक्राॅन होण्यास ही लक्षणं साधारणपणे कारणीभूत असल्याचं दिसून आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 मोठी बातमी! आमदार नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी; जामीन अर्जावर प्रक्रिया सुरु

रिपोर्टिंंग करणाऱ्या महिलेसमोर चाचानं केलं असं काही की…; पाहा व्हायरल व्हिडीओ

 एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंना मोठा झटका, ‘वयाच्या सतराव्या वर्षी…’

वाईन विक्रीबाबत ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मोठी बातमी! नितेश राणेंपाठोपाठ निलेश राणेंना देखील झटका, आता…