आजच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी ‘या’ महत्त्वाच्या योजना; निर्मला सीतारामन यांची घोषणा

नवी दिल्ली | केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आज आपला दुसरा अर्थसंकल्प सादर केला आहे. आजच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या योजनांची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्या आहेत.

शेतकऱ्यांसाठी 16 कलमी योजना सरकारने आखल्या आहेत. प्रथमत: शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं ध्येय सरकारने ठेवलं आहे. शेती पंपांना सौर उर्जेवर जोडण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. जी राज्य केंद्राच्या कायद्याचं मॉडेल स्वीकारतील त्या राज्यांना केंद्र प्रोत्साहान देईन, असं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे.

अन्नदाता उर्जादाता आहे. पंतप्रधान कुसुम योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा झालाय. पाणी प्रश्नांसाठी लढणाऱ्या 100 जिल्ह्यांसाठी व्यपक योजना केल्या जातील, असंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे.

-कृषी आणि संलग्न उपक्रम सिंचन आणि ग्रामीण विकास क्षेत्रासाठी 2020-21साठी 2. 83 लाख कोटी रूपये

-देशभरातील शेतकऱ्यांसाठी शितगृहांची साखळी तयार केली जाईल. कृषी उडान योजना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मार्गावर तयार केली जाईल. 

-शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं ध्येय सरकारने ठेवलं आहे, शेतकऱ्यांसाठी 6.11 कोटी विमा योजना

-2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार कटीबद्ध

महत्त्वाच्या बातम्या-

-केंद्राच्या बजेटकडे आमचं लक्ष आहे – अजित पवार

-मुख्यमंत्र्यांना सुट्टीवरच राहुद्या कारण आल्यावरही ते गोट्याच खेळतील; निलेश राणेंची मुख्यमंत्र्यावर बोचरी टीका

अरबी समुद्रातील शिवस्मारक योजना रद्द करण्यासाठी याचिका दाखल

-लज्जास्पद! कामाला जा पैसे कमवून आण…, 75 वर्षीय वृद्ध आईला मुलांनी घरातून हाकललं

-“साध्वी प्रज्ञा मूर्ख आहेत, आमचं दुर्दैव की त्या आमच्याच पक्षात आहेत”