नागरिकांनो घाबरू नका; भारत कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार-डॉ. हर्षवर्धन

नवी दिल्ली |  देशव्यापी लॉकडाऊन सुरू होऊन जवळपास दीड महिना पूर्ण झाला आहे. तरीदेखील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता केंद्रिय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

जनतेने घाबरून जाण्याची गरज नाही. भारत तोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार आहे, असं डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

कोरोनाने कितीही गंभीर परिस्थिती निर्माण झाली तरी सरकार पूर्णपणे सक्षम आणि तयार असल्याचं ते यावेळी म्हणाले. तसंच विकसित देशांमध्ये जशी परिस्थिती निर्माण झाली आहे तशी परिस्थिती आपल्याकडे होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.

करोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग पुन्हा एकदा वाढला आहे. वेग वाढून तो 12 दिवसांवरून आता 10 दिवसांवर आला आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तमिळनाडू, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये केंद्राची पथके सातत्याने पाहणी करत आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी शुक्रवारी दिली.

महत्वाच्या बातम्या-

-विधानपरिषद उमेदवारीबाबत शशिकांत शिंदे यांचा मोठा खुलासा

-“ज्या मुंबईने आम्हाला पोसलंय, तिला संकटकाळात सोडून जाणार नाही”

-चीनकडे कोरोनाचा फैलाव रोखण्याची क्षमताच नव्हती- डोनाल्ड ट्रम्प

-कोणत्याही लसीशिवाय कोरोना निघून जाणार; डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य

-“उपलब्ध झालेले रोजगार हीच संधी आहे… मराठी तरूणांनो नंतर गळे काढून रडू नका”