अमित शहा भडकले; म्हणाले…त्यासाठी जीवही देऊ

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये पाकव्याप्त काश्मीरचा समावेश होतो. तो सुद्धा भारताचाच भाग आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले आहेत. जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याची घोषणा  केल्यानंतर आज अमित शहांनी लोकसभेत निवेदन दिलं.

पाकव्याप्त काश्मीरसाठी जीव गेला तराही बेहत्तर…., मात्र पाकव्याप्त काश्मीर आमचाच आहे, असं म्हणत अमित शहा लोकसभेत भडकले.

काश्मीर हा भारताचा एक अविभाज्य घटक आहे. काश्मीरसाठीही संसद सर्वोच्च राहील. काश्मीरबाबत नवे कायदे संविधानात बदल करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असंही अमित शहांनी सांगितलं आहे.

ज्यावेळी मी जम्मू काश्मीर असा उल्लेख करतो त्यावेळी पाकव्याप्त काश्मीर आणि चीनव्याप्त काश्मीरचा समावेश होतो. मात्र हे दोन्हीही भाग भारताचेच आहेत, असं शहांनी ठसकावून सांगितलं आहे.

काश्मीरसाठी संसदच सर्वोच्च सभागृह आहे. काश्मीरप्रश्नी वेळप्रसंगी प्राणाचे बलिदानही देेऊ. काश्मीरमध्ये पाकव्यााप्त काश्मीरही येतो. त्यासाठी जीवही देऊ, असंही अमित शहांनी सांगितलं आहे. 

काश्मीरबाबत निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार संसदेला असल्याचं शहांनी सांगितलं. मात्र सरकारने नियमांचे उल्लंघन केलं असल्याचं काँग्रेसचे खासदार अधिर रंजन म्हणाले आहेत.

दरम्यान, यावेळी अमित शहा आणि अधिर रंजन यांच्यात जोरदार खडाजंगी पाबायला मिळाली.

महत्वाच्या बातम्या-

-संभाजी ब्रिगेड आता ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चं काम करणार!

-शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन राष्ट्रवादीच्या ‘शिवस्वराज्य यात्रे’स सुरुवात

-“सचिन पायलट किंवा ज्योतिरादित्यांना काँग्रेसचे अध्यक्ष करा”

-“जम्मू काश्मीरचा करार पंडित नेहरुंनी केला, सरदार पटेलांनी नाही”

-काँग्रेसला मोठा धक्का; राज्यसभेतील ‘या’ महत्वाच्या नेत्याचा राजीनामा