“मी अंघोळ करता करता थांबलो, चिठ्ठीवर निवडून येणं म्हणजे…”

मुंबई | सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चुरसीची लढाई होती. या निवडणुकीत निकालाकडं संपूर्ण राज्याकडं लक्ष्य राहिलं होतं. अखेर या निवडणुकीत राणे कुटुंबीयांना बाजी मारली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या गटाने बाजी मारत महाविकास आघाडीला पराभूत केलं. भाजपच्या या विजयानंतर अनेक बड्या नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

या निवडणुकीवर आता महाविकास आघाडीचे नेते आणि भाजपचे नेते यांच्यात कलगीतुरा रंगलेला दिसत आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी निवडणुकीच्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे.

कणकवलीमध्ये नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्याआधी नारायण राणे यांनी विठ्ठल देसाई यांच्याकडे बघून जिंकलास बरं वाटतंय का?, असा सवाल विचारला.

राणेंच्या या प्रश्नावरून चांगलाच हशा पिकला. नशीब हे नशीब, चिठ्ठीवर निवडून येणं म्हणजे मोठं नशीब लागतं. तू आम्हाला टेन्शनमध्येच पाठवलं होतं, मी आंघोळ करता करता थांबलो, असं राणे यांनी सांगितलं आहे.

सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई यांना समान मतं पडली होती. त्यावेळी देवेश एडके या साडेतीन वर्षांच्या मुलाला चिठ्ठी उचलण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं.

देवेशनं विठ्ठल देसाई यांच्या नावाची चिठ्ठी उचलली आणि महाविकास आघाडीला आणि शिवसेनेच्या साम्राज्याला धक्का बसला. त्यामुळेच सावंत यांचा पराभव झाला.

दरम्यान, मी आधीच सांगितलं होतं, ते हारणार आहेत. हे ऑटो रिक्षा सरकार आहे. यांची अवस्था अशीच होणार होती, असंही नारायण राणे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“अर्ध्या हळकुंडान पिवळं कित्याक व्हतास?, तुमी कितीव हातपाय आपटलास तरी…”

 “आपण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, राज्यात तिसरी लाट आली”

सतीश सावंतांच्या पराभवानंतर नितेश राणे अज्ञातवासातून बाहेर, ‘ती’ पहिली पोस्ट व्हायरल

‘धरणमूत्र पवार ओकून गेले,अख्खी चिवसेना ओकत होती पण…’; निलेश राणेंचा हल्लाबोल

सिंधुदुर्गात नारायण राणेंचा सेनेला ‘दे धक्का’; सतीश सावंत पराभूत