भोंग्याच्या वादावर केंद्रीय मंत्र्याची राज ठाकरेंवर जोरदार टीका, म्हणाले…

मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरेंनी राज्यात आपल्या आक्रमक भाषणांनी चांगलाच गोंधळ निर्माण केला आहे. राज ठाकरेंनी भोंग्याबाबत सरकारनं स्पष्ट भूमिका घेण्याची मागणी केली आहे.

औरंगाबाद येथील सभेत बोलताना राज ठाकरेंनी राज्य सरकारला धारेवर धरलं होतं. सरकारनं राज्यातील मशीदींवरील भोंगे हटवावेत, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.

राज ठाकरेंच्या मागणीनंतर आता राज्यात मोठा वाद उद्भवला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

राज ठाकरे हे सातत्यानं आपल्या पक्षाच्या झेड्यांचे आणि स्वत:च्या भूमिकांचे रंग बदलत आहेत. आता ते भगवा रंग अंगावर घेवून समाजात द्वेष माजवण्याचं काम करत आहेत, अशी टीका आठवलेंनी केली आहे.

भगवा रंग हा शांतीचा वारकरी संप्रदायाचा रंग आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावं. राज ठाकरेंच्या भोंग्यासंबंधीच्या भूमिकेशी आपण अजिबात सहमत नाही, असंही आठवले म्हणाले आहेत.

राज ठाकरे हे कधीच बाळासाहेबांची काॅपी करू शकत नाहीत. बाळासाहेब हे फार वेगळं नेतृत्व होतं, असं म्हणत राज ठाकरेंच्या भूमिकेवर आठवलेंनी ताशेरं ओढले आहेत.

मशीदींवरील भोंगे काढा अशी भूमिका बाळासाहेबांनी कधी घेतली नव्हती. त्यांनी नेहमीच मुस्लीम समाजाला पाठींबा दिला. फक्त दहशतवादी मुस्लीमांना त्यांनी विरोध केला, असंही आठवले म्हणाले आहेत.

दरम्यान, राज ठाकरेंनी भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतल्यापासून आठवलेंनी सातत्यानं राज ठाकरेंना आव्हान दिलं आहे. परिणामी मनसे आणि रिपाईमधील संघर्ष देखील वाढला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

मोठी बातमी! कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी अत्यंत महत्वाची माहिती समोर 

रशियन सैनिकाच्या कृत्याने खळबळ; हादरवणारा प्रकार समोर 

“मशिदीत पहाटेची अजान होणार नाही, पण साईबाबांची काकड आरती थांबवू नका”

सेक्स लाईफबाबत दीपिका पादुकोणचं मोठं वक्तव्य, म्हणाली…