नवी दिल्ली | कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असं वाटत असतानाच कोरोनाने देशात पुन्हा एकदा हात-पाय पसरायला सुरूवात केली आहे. कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत आहे.
कोरोनाने सर्वांचं टेंशन वाढलं असताना मंत्री देखील पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे.
स्मृती इराणी यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. स्मृती इराणी यांना याधीही कोरोनाची लागण झाली होती.
राजेंद्र नगर येथील कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याबद्दल स्मृती इराणी यांनी नागरिकांची माफि मागितली आहे. तर कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नसल्याचं स्मृती इराणी यांनी स्पष्ट केलं आहे.
स्मृती इराणी यांनी राजेंद्र भाटीया यांना मतदान करण्यासाठी आवाहन केलं आहे. तर भाजपच्या उमेदवाराला विजयी करा असंही स्मृती इराणी म्हणाल्या.
दिल्लीतील राजेंद्र नगर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली असून 23 जून रोजी मतदान पार पडणार आहे. यासाठी उमेदवार राजेंद्र भाटीया यांच्या समर्थनात रॅली काढण्यासाठी स्मृती इराणी राजेंद्र नगर येथे जाणार होत्या.
दरम्यान, स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांचा हा दौरा रद्द झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! काँग्रेसचा आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळला
भाजपच्या मतांवर काँग्रेसचा आक्षेप, अशोक चव्हाण म्हणतात…
“महाविकास आघाडी सरकारच्या अहंकाराचा या निवडणुकीत पराभव होणार”
’56 वर्षात जे घडलं नाही असा धक्का शिवसेनेला बसणार’, रवी राणांच्या दाव्याने खळबळ
“आज कुणीही पावसात भिजलं तरी काहीही उपयोग नाही, मविआ निवडणूक हरणारच”