केंद्र सरकारकडून अनलॉक-2 ची नियमावली जारी; कंटेनमेंट झोनमधील निर्बंध कायम

नवी दिल्ली | केंद्र सरकारकडून अनलॉक-2 ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. अनलॉक-2 दरम्यान देशात काय उघडणार आणि कशावर निर्बंध कायम राहणार याबाबतची नियमावली जारी करण्यात आली आहे.

कंटेनमेंट झोन वगळता इतर गोष्टींना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. रेड झोनमधले निर्बंध येत्या 31 जुलैपर्यंत कायम राहणार आहेत.  येत्या 1 जुलैपासून अनलॉक-2 चे नियम लागू होतील. 30 जूनला अनलॉक-1 चा कालावधी संपणार आहे. त्यामुळे केंद्राकडून अनलॉक-2 ची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अनेक गोष्टींसाठी सूट देण्यात आली आहे. टप्प्या-टप्प्याने देशात अनलॉकची प्रक्रिया राबवली जात आहे.

मर्यादित संख्येने स्थानिक विमानांना उड्डाण करण्याची आणि प्रवासी गाड्यांना प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. तसेच औद्योगिक यूनिट्स, राष्ट्रीय आणि प्रादेशिक महामार्गांवर माल वाहतूक करणारी वाहनं, बस, गाड्यांना रात्री प्रवासाची मूभा असेल. राज्यांतर्गत किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ये-जा करण्यासाठी आणि वस्तूंची ने-आण करण्यासही सूट देण्यात आली आहे. यासाठी ई-पासची गरज लागणार नाही.

देशातील प्रतिबंधित क्षेत्रात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. तसेच, हा लॉकडाऊन आणखी कठोर होणार आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्राबाबतचे निर्णय संबंधित राज्य ठरवणार आहे. तसेच, प्रतिबंधित क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-गुड न्यूज! कोरोनावरील पहिली लस भारतात तयार

-‘कोरोना काळात भ्रष्टाचार करण्याची हीच ती वेळ’; मनसेचा शिवसेनेवर हल्लाबोल

-‘काँग्रेसला उत्तरे देण्यापेक्षा चीनला प्रत्युत्तर द्यावं’; शिवसेनेचा मोदींना सल्ला

-पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधणार, काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष

-भारताचा चीनला हिसका, टिकटॉकसह 59 अ‌ॅपवर बंदी