मुलगा हट्टाला पेटला अन् बापाचं नशीब बदललं, रातोरात मालामाल

दुबई | कधी कोणासोबत काय होईल याचा काही नेम नसतो. मग ती एखादी काही वाईट गोष्ट असो वा एखादी चांगली. कोणाचं नशीब (Luck) चमकेल याचा भरवसा नाही.

असाच काहीसा प्रकार सध्या समोर आला आहे.  मागील 16 वर्षापासून दुबईत राहणाऱ्या श्रीरामचं या महिन्यात नशीब फळफळलं आहे.

गेल्या 30 वर्षापासून श्रीराम संयुक्त अरब अमिरातमध्ये राहतो. 16 वर्षापूर्वी त्यांने दुबईमध्ये वास्तव्यासाठी स्थलांतर केलं.

मागील काही दिवसांपासून श्रीरामचा मुलगा लाॅटरीचं तिकीट विकत घेण्यासाठी श्रीरामच्या मागे लागला होता. अखेर मुलाच्या हट्टापोटी श्रीरामने लाॅटरीचं तिकीट विकत घेतलं.

श्रीरामने दोन तिकीट एकामागे एक विकत घेतली होती. त्यानंतर एकाच महिन्यात दोनदा लॉटरी लागल्यानं आता रातोरात श्रीराम श्रीमंत झाला आहे.

काही क्षणातच श्रीरामच्या खात्यात तब्बल 31 लाख रूपये जमा झाले. त्यानंतर श्रीरामला त्याच्या नशिबावर विश्वासच बसला नाही.

मी स्तब्ध आहे, माझ्याकडे काही शब्द नाहीत. मी जे नंबर निवडले होते ते एकाच महिन्यात ड्रॉमध्ये दोनदा विजेता म्हणून येतील, यावर माझा मला विश्वास बसत नाही, असं श्रीराम म्हणाला.

दरम्यान, जमा झालेल्या पैश्यांमधून विविध पद्धतीने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची योजना बनवत असल्याचं देखील श्रीरामने सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या – 

“जगाची चुकीची बाजू वर…”, अमृता फडणवीस यांचं नवं ट्विट चर्चेत

राज ठाकरेंना मोठा धक्का! न्यायालयाकडून अजामीनपात्र वाॅरंट जारी

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना कोरोनाची लागण

भीषण दुर्घटना! ‘या’ ठिकाणी गॅस गळतीमुळे 6 जणांचा मृत्यू

मोठी बातमी! आजपासून काही दिवस CNG राहणार बंद