शेतीसाठी केंद्र सरकारकडून आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पॅकेजची घोषणा

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयाचं ‘स्वावलंबी भारत अभियान’ पॅकेज जाहीर केलं. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी दोन दिवस पत्रकार परिषद घेत या पॅकेजची सविस्तर माहिती दिली. आज सलग तिसऱ्या दिवशी निर्मला सीतारमन यांनी पत्रकार परिषद घेत शेतकरी आणि शेतीपुरक व्यवसायांसंबधी मोठ्या घोषणा केल्या आहेत.

शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी 1 लाख कोटींचं पॅकेज देण्यात आल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. तसेच कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी हे पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे.

शेतकऱ्यांसाठी गेल्या दोन महिन्यांत अनेक उपाय योजना करण्यात आल्या आहेत असंही निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. दोन महिन्यात 74 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची धान्य खरेदी करण्यात आल्याचंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, देशातल्या 2 कोटी शेतकऱ्यांना व्याजावर सबसिडी देण्यात आली आहे. दूध उत्पादकांना लॉकडाउनच्या काळात 4 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम दिल्याचंही अर्थमंत्र्यांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

-पावसाचं धुमशान… पाहा पावसाचे व्हिडीओ

-कोरोनाचा सामना करणाऱ्या भारताला वर्ल्ड बँकेकडून दिलासा; केली मोठ्या मदतीची घोषणा

-मुंबईवरुन लपूनछपून आलेल्या जावयाचा कोरोनामुळे मृत्यू; पारनेरचे 200 जण क्वारंटाईन

-दारु पाजून महसूल मिळवण्यापेक्षा देवस्थानांचं सोनं सरकारनं व्याजानं घ्यावं- तृप्ती देसाई

-पंतप्रधान किसान योजनेचे पैसे तुमच्या खात्यात आले नसतील तर अशी करा तक्रार…