मुख्यमंत्री आल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही; उन्नाव बलात्कार पीडितेच्या कुटुंबाचा निर्णय

लखनऊ | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भेटायला येणार नाहीत, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा निर्णय उन्नाव बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. योगी आदित्यनाथ यांनी भेट घ्यावी आणि आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देण्याचं आश्वासन द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू असताना पीडिेतेचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री 10: 40 वाजताच्या सुमारास पीडितेचे निधन झालं. त्यानंतर शनिवारी रात्री पीडितेचा मृतदेह रुग्णालयातून तिच्या मूळ गावी उन्नावमध्ये आणण्यात आला. मात्र अद्याप तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीत.

बलात्कार प्रकरणात जामिनावर सुटलेल्या आरोपींनी सुनावणीसाठी जात असलेल्या पीडितेला जिवंत जाळले. यात ती 90  टक्के भाजली होती. अखेर तीचा मृत्यु झाला.

दरम्यान, पीडितेच्या कुटुंबियांना योगी आदित्यनाथ यांनी 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र आता योगी आदित्यनाथ त्याठिकाणी जातात का हे पाहावं लागेल.

महत्वाच्या बातम्या-