Ramdas Athawale: “…तोपर्यंत सरकार पडणार नाही”, रामदास आठवलेंनी स्पष्टच सांगितलं

मुंबई | केंद्रीय तपास यंत्रणेने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार देखील आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. अशातच महाविकास आघाडीतील अंतर्गत बंडाळी देखील चर्चेचा विषय ठरत आहे.

काँग्रेस आमदारांमध्ये नाराजीचं वातावरण दिसत असतानाच दुसरीकडे शिवसेना राष्ट्रवादीकडे असलेल्या गृहखात्यावर नाराज असल्याचं पहायला मिळत आहे.

महाविकास आघाडीत नाराजीचं नाट्य सुरू असताना आता भाजप देखील सर्व घडामोडींवर नजर ठेऊन आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

महाविकास आघाडी सरकार पडावं ही माझी इच्छा आहे. मात्र काँग्रेस जोपर्यंत पाठिंबा देत आहे तोपर्यंत तरी महाविकास आघाडी सरकार पडणार नाही, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे.

रामदास आठवले एक दिवसाच्या परभणीच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय. केंद्रीय यंत्रणांवर आरोप करण्यात येत आहेत ते पूर्णपणे चुकीचं असल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय तपास यंत्रणा स्वायत्त आहेत, त्यामुळे त्या ज्या काही तपास करतात, असंही ते यावेळी म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार यांच्याशी आमचे चांगले संबंध असल्याचं देखील रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘देशातील महागाई कमी होवो…’, म्हणत गिरीश बापटांनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

“उसाची शेती वाढल्यानं मला काळजी वाटतेय”

“भाजपमध्ये सगळेच जवळचे, ते आमच्यासाठी गुळाचं पोतं” 

‘युपीए’च्या अध्यक्षपदासाठी प्रकाश आंबेडकरांनी सुचवलं ‘हे’ नाव, म्हणाले… 

Petrol Diesel Prices Today | आज पुन्हा ‘इतक्या’ रूपयांनी पेट्रोल-डिझेल महागलं