‘…तोपर्यंत त्यांना अटक करू नये’; नितेश राणेंना पुन्हा न्यायालयाचा दिलासा!

मुंबई | संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) चांगेलच अडचणींत सापडले आहेत. याप्रकरणी त्यांच्यावर अनेक दिवसांपासून आरोप करण्यात येत आहे.

नितेश राणेच या प्राणघातक हल्ल्यामागचे सूत्रधार असल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला. हे आरोप सिद्ध करणारे तपशीलवार प्रतिज्ञापत्र सादर करत पोलीसांनी न्यायालयात ही माहिती दिली आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. राणे यांच्या जमीन अर्जावर सुनावणी होत नाही तोपर्यंत त्यांना अटक करू नये, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

न्यायालयाने राणेंना तात्पुरता दिलासा दिला आहे. नितेश राणेंवर पुढील सुनावणीपर्यंत अटकेची कारवाई करता येणार नाही. त्यामुळे राणेंना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून ते गायब आहेत. यावरुन चांगलंच राजकारण तापलं आहे. यावरुन राजकीय वर्तुळात अनेक आरोप-प्रत्यारोप पहायला मिळाले.

नितेश राणे यांच्यामुळे नारायण राणेही अडचणींत आले आहेत. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, नितेश राणे आमदार आहेत त्यामुळे याचिकेवरील सुनावणी सुरू असेपर्यंत त्यांना कठोर कारवाईपासून संरक्षण मिळायला हवे, अशी मागणी नितेश राणेंच्या वकीलांनी न्यायालयात केली.

भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणी वाढ झालेली पहायला मिळत आहे. अशातच आता नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार अद्यापही कायम आहे. कोणत्याही क्षणी नितेश राणेंना अटक होऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “आयुष्यभर बूस्टर डोस घेत रहायचं का?”; काॅंग्रेस खासदाराचा सरकारवर हल्लाबोल

 ‘या’ गोष्टी केल्या तर कोरोना संपेल, WHO च्या प्रमुखांचं मोठं वक्तव्य

 ‘Omicron ला बूस्टर डोस सुद्धा रोखू शकत नाही, सर्वांना…’; तज्ज्ञांच्या दाव्याने खळबळ

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी; टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिली महत्वाची माहिती 

“तुमच्यासारखी जी टेकाडं आहेत त्यांना सह्याद्रीच्या उंचीशी स्पर्धा करता येणार नाही”