अवकाळी पावसाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासनाचा दिलासा; दिले पंचनामे करण्याचे आदेश

मुंबई |  राज्यात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून राज्यात अवकाळी पाऊस कोसळतो आहे. यामुळे शेतकऱ्याचं आलेलं पीक मातीमोल झालं आहे. अशा लाखो शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसंच या उन्हाळ्यात पाणी टंचाई असलेल्या भागांना टँकर पुरवण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याबाबत त्यांना अधिकारही देण्यात आलेले आहेत.

गेल्या दोन ते अडीच महिन्यांच्या काळात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये कोल्हापूर, सांगली, जालना, लातूर, धुळे, अकोला बुलडाणा, नागपूर, अमरावती, वर्धा, भंडारा या आणि अशा जिल्ह्यांमध्ये धुंवाधार पाऊस कोसळला. तसंच कोकणात देखील आंबा आणि काजू बागायतदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे.

33 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या निर्णयानुसार योग्य ती मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी बाधित क्षेत्राचे पंचनामे करावेत असे आदेश मदत आाणि पुनर्वसन विभागाने दिले आहेत. पंचनामे झाल्यावर नुकसानीचा आकडा समोर येईल आणि त्यानुसार बाधित शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असं शासनाने सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-गेहलोत सरकारचा मोठा निर्णय; 5 कोटी लोकांना वाटणार मोफत गहू

-महाराष्ट्र असाच चालवला तर लोक चपलेने आभार मानतील, निलेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

-“बारामतीत भिलवाडा पॅटर्न मग जामखेडला का नाही???”

-गुजरातमध्ये कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढली; महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातचा नंबर

-राज्यात रुग्ण दुपटीचा दर 7 दिवसांवर गेलेला आहे, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहीती