आज ‘या’ भागात कोसळणार पाऊस, हवामान खात्याने दिला इशारा!

पुणे | गेल्यावर्षाभरापासून एकीकडे कोरोना रोगाने थैमान घातलं आहे. तर दुसरीकडे बदलत्या हवामानाने नको-नकोस केलं आहे. अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे त्याचबरोबर अनेक पीकांचे नुकसान होतं.

आताकुठे कडाडीचा उन्हाळा जाणवायला लागला असताना, अशातच पुन्हा पाऊस डोकं वर काढायला सुरुवात करत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात तापनात मोठा बदल घडल्यामुळे काही भागात पुढील काही दिवसामध्ये हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वी राज्यातील तापमानाचा पारा घसराला आहे. त्यामुळे मुंबईसह, पुणे, विदर्भ, मराठावाडा या भागाला दिलासा मिळाला आहे. परंतू राज्यात पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्यात ढगाळ वातावरण असल्यामुळे अनेक ठिकाणी पाऊसाने हजेरही लावली आहे.

अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले असल्याचं पाहायला मिळालं होतं. तसेच आज मराठवाडा आणि विर्दभ या परिसरात ढगाळ  वातावरण असल्यामुळे अवकाळी पाऊसाचा पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

शनिवार 10 एप्रिल रोजी पुणे शहरासह ग्रामीण भागातही ढगाळ वातावरण पाहायला मिळालं होतं. तसेच काही ठिकाणी पाऊसही पडला होता. त्यामुळे पुणेकरांना कडाक्याच्या उन्हाळ्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र अजूनही पुण्यात अवकाळी पावसाचा धोका कमी झालेला नाही.

आजही पुणे शहरासह ग्रामीण भागातही सकाळापाऊस ढगाळ वातावरण पाहायला मिळतं आहे. त्यामुळे आजही पुण्यात पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने आजा कोणत्या भागात पाऊस पडणार हे सांगितले होते. या संदर्भात हवामान खात्यातील तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून ट्विट करत ही माहिती दिली होती. चंद्रपूरमध्ये एक- दोन ठिकाणी विजांसह कडाडीसह पाऊस पडण्याची शक्यता. तसेच गडचिरोली- गडचिरोलीमध्येही एक-दोन ठिकाणी विजांसह कडाडीसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या-

‘एवढी गचाळ का राहतेस?’; टीका करणाऱ्या महिलेला…

अहो काकी भाजी कितीला देणार?; ‘या’ फोटोमुळे…

‘तुझं गाणं कोण ऐकत, तू नाकातून गातो’, असं…

ख्रिस गेलचं ‘हे’ गाणं सोशल मिडीयावर तूफान…

कोरोनामुळे अशी झाली कतरिना कैफची अवस्था, फोटो शेअर करत…