“500 वर्षांची प्रतीक्षा संपली, 135 कोटी भारतवासियांसाठी आणि जगातील हिंदूंच्या भावनांना पूर्ण करणारे मोदी पहिले पंतप्रधान”

अयोध्या | अयोध्या नगरीत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ज्या गोष्टीची रामभक्त आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर पार पडला आहे. यावेळी भूमिपूजन सोहळा पार पडल्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बोलताना आपलं मत व्यक्त केलं आहे.

नरेंद्र मोदींनी या क्षणामागे 500 वर्षांचा संघर्ष, साधना आहे. 135 कोटी भारतवासियांसाठी आणि जगातील अनेक हिंदूंच्या भावनांना पूर्ण करणारे नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान आहेत, असं योगी आदित्यनाथ यांनी यावेळी म्हटलं आहे.

मोदींनी कायदेशीर तसंच शांततेच्या मार्गाने समस्येचं निराकरण कसं केलं जातं हे दाखवून दिलं आहे. नरेंद्र मोदींमुळे हा क्षण सत्यात उतरला आहे, असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भारताची लोकतांत्रिक मूल्य, कायदेशीर प्रक्रिया, संविधानाची संमती या सगळ्या प्रक्रियेतून जात आज हा दिवस दिसतो आहे. या क्षणाची वाट पाहत अनेक पिढ्या गेल्या. अनेक महापुरुषांनी बलिदान दिलं. आपल्या डोळ्यांसमोर राम मंदिर उभं राहावं अशी अनेकांची इच्छा असल्याचं योगीं आदित्यनाथ यांनी सांगितलं.

 

महत्वाच्या बातम्या-

रामाचा वनवास अखेर संपला; ऐतिहासिक राम मंदिराचं भूमिपूजन संपन्न

“राम मंदिराला न्याय मिळवून देणारे गोगाई अन् बाबरीची घुमटे पायापासून उध्वस्त करणारी शिवसेना कुठेच नाही”

पंतप्रधान मोदींचं प्रभू श्रीरामांना साष्टांग दंडवत; भूमिपूजन स्थळी दाखल

राम मंदिर पायाभरणीच्या दिवशी असदुद्दीन औवेसींचं खळबळजनक ट्विट; म्हणाले…

शिवसेनेचा लखलखता तारा निखळला; 25 वर्ष आमदारकी बजावणाऱ्या ‘या’ माजी मंत्र्याचं निधन