पालघर हत्याकांड प्रकरणी योगी आदित्यनाथांचा मुख्यमंत्र्यानां फोन म्हणाले…

मुंबई | पालघरमध्ये चोरीच्या संशयातून शेकडो जणांच्या झुंडीने केलेल्या तिघांच्या हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद देशभरातून उमटत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली.

पालघरमध्ये झालेल्या तिघांच्या हत्येसंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काल संध्याकाळी बोलणे झाले. या घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी केली, असं ट्वीट योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.

पालघर येथे घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी दोन साधू, एक ड्रायव्हर आणि पोलिस कर्मचार्‍यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे.

दरम्यान, खासदार गौतम गंभीर, कुस्तीपटू बबिता फोगाट, अभिनेता फरहान अख्तर अशा विविध स्तरातील व्यक्तींनी सोशल मीडियावरुन संताप व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पालघर प्रकरणी सोशल मीडियावरुन आग लावणाऱ्यांना शोधून काढणार- उद्धव ठाकरे

-“मुख्यमंत्री पदावर कोण आहे हे बघण्यापेक्षा, त्या पदाचा मान राखला पाहिजे”

-आपण काय करतो याचं भान भाजप नेत्यांनी सोडू नये; गृहराज्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

-“मुख्यमंत्र्यांना सल्ले देऊ नका, त्यांना त्यांचे काम करू द्या”

-कोरोना लागण होतोना कोणताही वंश, धर्म, रंग, जात, पंथ, पाहत नाही – नरेंद्र मोदी