“100 आमदार भाजप सोडण्याच्या तयारीत”; ‘या’ बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

लखनऊ | उत्तर प्रदेश विधानसभेच्या (Uttar Pradesh Election) निवडणुकीचा कार्यक्रम आता जाहीर झाला आहे. त्यामुळे आता उत्तर प्रदेशातील राजकीय घडामो़डींना वेग आल्याचं पहायला मिळतंय.

अशातच आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकीआधी भाजपला एकापाठोपाठ एक धक्क्यावर धक्के बसताना पहायला मिळतंय. उत्तर प्रदेशमधील अनेक नेते आता भाजपला रामराम ठोकत असल्याचं दिसतंय.

उत्तर प्रदेशमधील आमदार डॉ. मुकेश वर्मा यांनी भाजपला निरोप दिल्यानंतर आता भाजपला सोडचिठ्ठी देणाऱ्या आमदारांची संख्या 7 वर पोहोचली आहे.

मंगळवारी योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपला मोठा बसल्याचं सांगितलं जातंय. अशातच आता स्वामी प्रसाद मौर्य यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

भाजपचे शंभर आमदार पक्ष सोडणार आहेत, असा खळबळजनक दावा मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिल्यानंतर केला आहे. यामुळे राज्यातील भाजपमध्ये लवकरच फूट पडण्याची चिन्हे आहेत.

स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचे समर्थक आमदार मुकेश वर्मा यांनीही पक्षाला रामराम ठोकला. त्यानंतर आता आणखी 100 आमदार पक्ष सोडणार असल्यामुळे आता भाजपचे प्रमुख नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, योगी सरकारच्या कामकाजामुळे उत्तर प्रदेशात भाजप सर्व बाजूने अडकल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

“विधानपरिषदेच्या जागा म्हणजे काय महाप्रसाद आहे का?”; मित्रपक्षानेच उडवली काॅंग्रेसची खिल्ली

 “आता कच खाऊ नका”; उद्धव ठाकरेंच्या निर्णयाला राज ठाकरेंचा पाठिंबा

गोल्डनमॅन सचिन शिंदे हत्या प्रकरणी खळबळजनक माहिती समोर!

उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी उलथापालथ, भाजपला सलग सातवा झटका 

भारतातील कोरोना स्थितीबाबत अमेरिकेतील तज्ज्ञांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…