कन्हैया कुमारवर आंदोलकाने फेकली शाई, म्हणाला “तो देशद्रोही आहे, जो देशाचा…”

मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता चांगलंच राजकारण तापल्याचं पहायला मिळतंय. गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, पंजाबमध्ये या पाच राज्यात जोरदार प्रचार होताना दिसतोय.

अशातच आता भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपापले स्टार प्रचारक मैदानात उतरवले आहेत. भाजपकडून स्वत: अमित शहा यांनी उत्तर प्रदेशात तळ ठोकल्याचं पहायला मिळालं होतं. तर काँग्रेसने युवा नेते प्रचारासाठी पाठवले आहेत.

नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या कन्हैया कुमार यांनी जोरदार प्रचारास सुरूवात केली आहे. अशातच यूपी काँग्रेस कार्यालयात काही लोकांनी कन्हैया कुमारवर शाई फेकल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते प्रचारात भाग घेण्यासाठी मंगळवारी लखनऊला पोहोचले होते. त्यावेळेस त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. लखनऊ सेंट्रलचे उमेदवार सदफ जफर यांच्या प्रचारासाठी कन्हैया गेले होते.

काँग्रेसने कन्हैया कुमार यांच्यावर अँसि़डफेक झाल्याची माहिती दिली आहे. त्यावर अद्याप स्पष्ट माहिती समोर आली नाही. या हल्ल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आरोपीला पकडलं.

पकडण्याच आलेल्या हल्लेखोराने कन्हैया कुमारला देशद्रोही म्हटलं आहे. त्याचा कार्यक्रम लखनऊला का व्हावा? जो देशाचा नाही तो आपला कसा होईल?,असा सवाल त्या हल्लेखोराने विचारला आहे.

दरम्यान, कन्हैयावर हल्ला झाल्यानंतर उत्तर प्रदेशचं राजकारण पेटलं आहे. काँग्रेस आणि भाजपमधील वाद चांगलाच पेटल्याचं पहायला मिळतंय.

10 फेब्रुवारीपासून उत्तर प्रदेशातील 403 विधानसभा जागांसाठी सात टप्प्यांत मतदान सुरू होणार आहे. यूपीमध्ये 10, 14, 20, 23, 27 आणि 3 आणि 7 मार्च रोजी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

पाहा व्हिडीओ-


महत्त्वाच्या बातम्या – 

काॅमेडी किंग कपिलचा मोठा खुलासा! तब्बल 20 वर्षानंतर म्हणाला, “होय आम्हीच तुमच्या घरातील…”

“नितेश राणेंना अटक झाल्याशिवाय जामीन मिळणार नाही”; अनिल परब यांचा दावा

 “कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढला पाहिजे”, हिंदुस्थानी भाऊवर रुपाली पाटील कडाडल्या

रणबीरचा ‘हा’ चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी सोडली नोकरी, जाणून घ्या काय होतं कारण

नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळताच निलेश राणेंचा न्यायालयाबाहेर राडा, पोलिसांशी बाचाबाची