लॉकडाउनच्या नियमांचा भंग केल्याने उत्तर प्रदेश पोलिसांकडून अजब शिक्षा, म्हणाले…

लखनऊ | कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील नागरिकही त्याला पाठींबा दर्शवत नियमाचं पालन करत आहे. पण काही जणांनी लॉकडाउनच्या नियमांचं उल्लघंन केल्याचं समोर आलं आहे.

लॉकडाउनचं उल्लघंन करणाऱ्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा तसेच मी गाढव आहे. या सारखे बॅनर अंगावर घ्यायला लावून पोलिसांनी याआधी अनोखी शिक्षा केली होती. उत्तर प्रदेशमधील पोलिसांनीही अशाच प्रकारची अजब शिक्षा केल्याचं समोर आलं आहे.

इटावा येथील पोलिस स्थानकातील एका कर्मचाऱ्याने लॉकडाउनचा नियम मोडणाऱ्याला चक्क सपना चौधरीच्या गाण्यावर ठुमका धरायला लावला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दरम्यान, व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत एक व्यक्ती सपना चौधरीचं प्रसिद्ध गाणं ‘तेरी आख्या का यो काजल…’ या गाण्यावर डान्स करत असल्याचं दिसत आहे. उमर राशिद यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये पोलिस त्या तरूणाचा डान्स पाहत असल्याचं दिसतंय.

 

महत्वाच्या बातम्या-

-“व्यसनाला असलेली भिकार प्रतिष्ठा सगळ्यांना घेऊन बुडणार एक दिवस”

-भाजपने विधानपरिषदेची एक जागा ‘रिपाइं’ला सोडावी- रामदास आठवले

-UPSC परीक्षेसंबंधी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय

-“मजूरांकडून रेल्वेभाडं घेणार नाही तर प्रत्येकी पाचशे रुपये मदत देणार”

-परदेशातील भारतीयांना विमानातून फुकट आणलं, मग स्थलांतरित कामगारांकडूनच पैसे का?- प्रकाश आंबेडकर